महिला सक्षमीकरण म्हणजे स्वावलंबनाची वाट
Pawana.in ग्रामीण आणि निमशहरी महिलांना प्रत्यक्ष व्यवसाय, उत्पादन आणि कौशल्यांच्या आधारे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काम करते.
आजची वास्तव परिस्थिती
अनेक महिला मेहनत करायला तयार आहेत, पण “काय करायचं?”, “कुठून सुरू करायचं?” आणि “होईल की नाही?” या प्रश्नांमध्ये अडकलेल्या असतात.
माहिती तुकड्यांत मिळते, मार्गदर्शन अपुरं असतं, आणि चुकीच्या सल्ल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास ढासळतो.
महिला सक्षमीकरण का गरजेचं आहे?
जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समुदाय मजबूत होतो.
सक्षमीकरण म्हणजे नुसती मदत नाही, तर महिलेला स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद देणं.
आमचा फोकस
- ग्रामीण व निमशहरी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
- स्वयं-साहाय्य गटांद्वारे सामूहिक व्यवसाय
- मॅन्युफॅक्चरिंग आणि उत्पादन आधारित संधी
- सातत्यपूर्ण उत्पन्न निर्माण करणारी मॉडेल्स
आमची दृष्टी
प्रत्येक महिला आत्मविश्वासाने उभी राहावी, स्वतःचा व्यवसाय समजून घ्यावा आणि भविष्यासाठी सक्षम निर्णय घ्यावा.
आमचं मिशन
- महिलांसाठी योग्य व्यवसाय निवड सुलभ करणे
- उत्पादन व मॅन्युफॅक्चरिंग कौशल्य देणे
- बाजारपेठेशी थेट जोडणी करून देणे
- व्यवसाय स्थिर होईपर्यंत सोबत राहणे
Pawana.in कसं काम करतं?
समजून घेणं
महिलांची पार्श्वभूमी, संसाधनं आणि क्षमता समजून घेतो.
योग्य दिशा
व्यवहार्य आणि टिकाऊ व्यवसाय निवडण्यासाठी मार्गदर्शन.
प्रत्यक्ष प्रशिक्षण
फक्त सांगत नाही, प्रत्यक्ष करून दाखवतो.
सतत साथ
व्यवसाय सुरू झाल्यानंतरही मार्गदर्शन सुरूच राहतं.
स्किलिंग ते स्वावलंबन
Pawana.in मध्ये स्किलिंगचा उद्देश केवळ प्रशिक्षण देणं नसून महिलांना प्रत्यक्ष उत्पन्न मिळवून देणं आहे.
उत्पादन निवड
मागणी असलेली, विक्रीयोग्य उत्पादने.
उत्पादन प्रक्रिया
गुणवत्ता, सातत्य आणि कार्यक्षमता.
विक्री आणि बाजार
फक्त तयार नाही, तर विक्रीही.
आर्थिक स्थैर्य
नियमित उत्पन्न आणि आत्मविश्वास.
तुमचाही प्रवास इथून सुरू होऊ शकतो
योग्य दिशा, योग्य साथ आणि स्वतःवरचा विश्वास.
